हॅलो आपण सर्वाना रिमझिम बरसणाऱ्या पावसाचा आनंद पुरेपूर मिळो हि शुभेछया
मित्रानो पावसाचा आनंद घ्या पण त्याबरोबर आरोग्याचे काळजी सुध्दा
म्हणजेच आहार पण आला ह्या वातावरणात बऱ्याच जणांना वेग वेगळे पदार्थ खाण्याची व निसर्गरम्य पर्यटनाची आवड असते हो मलासुद्धा अशी आवड आहे पण तब्बेतसांभाळून
चाल तर वाचूया काय काळजी घ्यावी …………

- पावसात ओले होणे शक्यतो टाळावे .
- हात पाय स्वछ ठेवा.
- अंघोळ करताना शक्यतो पाण्यात थोडे डेटॉल मिसळा .
- पाणी स्वच्छ प्यावे आरो चे आसवे.
- अशुद्ध पाण्याने पोटदुखी, डायरिया इत्यादी होण्याची शक्यता असते.हिरव्या पालेभाज्या खाणे टाळावे.
- पाणी भरपूर प्यावे चमचमीत तेलकट खाऊ नये जसे सामोसा, कचोरी , इ . रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ मुळीच खाऊ नये
सायनस , मायग्रेन.चा त्रास असल्यास ताक दही लस्सी असे पदार्थ खाऊ नये . जंकफूड मुळीच नको . सूप ,आल्याचा चहा घ्यावा . नाश्त्यामध्ये पोहे , उपमा, इडली, उकडलेले पदार्थ असावे.आहार पचायला हलका व रोगप्रतिकार शक्ती टिकविणारा असावा. रोज एक सफरचंद खावे
एक / दोन बदाम रोज खा ह्यामुळे साखरेची पातळी व वजन नियंत्रणात राहते. आहारात लसूण प्रमाणशीर वापरावा जो इम्युनिटी वाढवण्यास मदत करतो व मेटाबोलिसम चा रेट स्थिर
ठेवत . काळे मिरे पूड वापरावे . घरातील खोल्या व बाहेरचा परिसर स्वछ ठेवावा डास होणार नाही याची काळजी घ्या. पावसाने वातावरणात आर्द्रता व गारवा असतो त्यामुळे वॉर्डरोब इ .थंड असतात त्यासाठी कपडे नियमित इस्त्री करा ज्याने त्वचेला उब मिळेल.घरातील वृद्धांची विशेष काळजी घ्या.
महत्वाचे म्हणजे व्यायाम करा. कारण आरोग्यम धनसंपदा…….ती आपण टिकवलीच पाहिजे.
अश्या प्रकारे काळजी घेतल्यास पावसाच्या प्रत्येक थेंबा सोबत मन आनंदी , व
शरीर , सुधृद राहील .
पुन्हा लवकरच भेटू नवीन माहिती सोबत. तोपर्यंत आपण पावसाचा आनंद घ्या.
धन्यवाद !
